नाशिक : नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा घेताना केंद्रीय त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी […]
टॅग: Nashik
नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा
मुंबई : नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नाशिक येथे मुलींचे शासकीय वसतीगृह ज्या जागेत आहे त्या जागेतील २४८५ चौरस मिटर क्षेत्र वसतीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी वसतीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे म्हणजेच […]
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 खाटांच्या क्रिटीकल केअर सेंटरसाठी 40 कोटी मंजूर
नाशिक : कोविड 19 साथीच्या आजाराने भारतालाच नव्हे तर जगाला हे दाखवून दिले आहे की आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज असणे हे अति आवश्यक असल्याने यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मंडविया यांच्या […]
ठाणे, बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, पालघर येथील नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज
मुंबई : मुंबई शहरातील नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच दिनांक 18 जुलै 2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत 200 नागरी संरक्षण स्वयंसेवकांना आपत्ती निवारणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नागरी संरक्षण दलाच्या ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, पालघर, जिल्हा […]
नाशिकमध्ये गॅस गळती होऊन भीषण स्फोट, एका महिलेचा मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये गॅस गळती होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. गॅस गळती होऊन स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर भागातील आहे. स्फोट झाल्यानंतर दोघींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, महिलेचा मृत्यू झाला होता. या स्फोटात अर्चना सिंह यांचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय तरुणी आस्था […]
रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण
पुणे, दि. 7 : रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन […]
फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर दोन दिवसांनंतर लाचलुचपत कार्यालयात हजर
नाशिक : आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या चौकशीनंतर फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत. अटक पूर्व जामिनावर सुनावणी होण्यापूर्वी त्या एसीबी कार्यालयात दाखल झाल्या. आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. एका शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे […]
अभिनेत्री हीना पांचाळसह 22 जणांना हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीत अटक
नाशिक : अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. तिथून ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीत एकूण २२ जण ड्रग्ज, कोकेन, गांजा यांचं सेवन करत होते. यात बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि हिंदी […]
नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, काय सुरु आणि काय बंद राहणार, जाणून घ्या..
नाशिक : नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. किराणा माल, दूध, बेकरी आणि मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यातून औषध, […]
शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]









