नागपूर : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार उद्या रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व […]
टॅग: Nagpur
पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज विधानपरिषदेत प्रत्यक्षात 88 तास 33 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज […]
नागपूर देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : नागपूर शहरातील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे करण्यात येऊन हे शहर खड्डेमुक्त व देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसीत करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जयताळा येथे नागपूर महानगरपालिका, नासुप्र आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विविध विकासकामांचे डिजिटल लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय […]
नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
मुंबई : डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.
नागपूरच्या शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांसाठी ३५ अधिसंख्य पदांना मान्यता
मुंबई : नागपूर येथील शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्मचाऱ्यांना कोणतीही वेतन थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. यासाठी १ कोटी १७ लाख ३ हजार ४६८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे […]
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई : विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी नागपूर सज्ज
नागपूर : महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी […]
नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रु.43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.
नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नागपूर : नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतीगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग,व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा […]
नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली आणि…
नागपुर : नागपुरात शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने पेट्रोल पिऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवम कटरे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो BCA द्वितीय वर्षात शिकत होता. आत्महत्या केल्यानंतर सदरील तरुणाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम मोरेश्वर कटरे (रा. दाभा) […]








