Bhayyaji Joshi's statement sparks reactions from Shiv Sena and NCP
महाराष्ट्र मुंबई

भैय्याजी जोशींच्या ‘मुंबईत मराठी नाही, गुजरातीही चालेल’ वक्तव्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया, जोशी यांचे स्पष्टीकरण…

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविध भाषिक संस्कृतीसंबंधी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये संताप व्यक्त करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मराठी भाषेची महत्त्वपूर्ण ओळख आहे, आणि या विधानामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. भैय्या जोशी यांनी मुंबईतील भाषिक विविधता आणि […]

Shiv Sena Shinde faction office in Mumbai with liquor bottles and glasses, controversy sparked by viral video
ठाणे महाराष्ट्र राजकारण

मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात दारू पार्टी रंगली, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, २ मार्च २०२५: मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी दारू पार्टी आयोजित केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. व्हिडिओमध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यकर्ते दारू पिताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कार्यालयातील दोन टेबलांवर […]

महाराष्ट्र मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रधानमंत्री मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा […]

Police constable dies after falling from train
महाराष्ट्र मुंबई

पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू, रात्रभर मिळाली नाही मदत…

मुंबई: एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. हा पोलीस हवालदार सुमारे सहा ते सात तास गंभीर अवस्थेत रेल्वे रुळावर पडून राहिला.  परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमित ज्ञानेश्वर गोंदके (वय २८) असं या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी गोंदके कर्तव्य बजावल्यानंतर डोंबिवली येथे […]

The person who sent the obscene audio tape was finally arrested
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न

मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती […]

Increase resources to control pollution in Mumbai – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी पहाटे फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, […]

Government of Maharashtra
देश महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या १४१ व्या सत्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार उद्‌घाटन

नवी दिल्ली : मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सत्राचे उद्‌घाटन करणार आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिम्पिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १३ सप्टेंबर रोजी मालाड, मुंबई येथे आयोजन

मुंबई : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी एन.डी. शहा कॉलेज, (एसएनडीटी), मालाड (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या वेळेत महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. […]

Minister Girish Mahajan
महाराष्ट्र

मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी […]

Mumbai: Fire breaks out in BEST’s electric bus at Malvani depot
महाराष्ट्र मुंबई

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला बॅटरी चार्ज करताना लागली आग

मुंबई : मुंबईतील नागरी वाहतूक संस्था बेस्टद्वारे चालवल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक बसला बॅटरी चार्जिंग करताना आग लागली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या बसला मालवणी उपनगरात आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. बसच्या छतावर असलेल्या बॅटरी सेटमध्ये ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बेस्टच्या […]