नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला आहे. पण, आरोग्य तज्ञांनी सोमवारी सांगितले की घाबरण्याची गरज नाही, कारण मंकीपॉक्स व्हायरस महामारीचे रूप धारण करण्याची शक्यता फारच कमी आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, भारतात या विषाणूचा रुग्ण आढळल्याने लोकांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेत क्लेड 1 हाहाकार माजवत आहे. गेल्या वर्षीही भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला […]
टॅग: monkeypox
अनेक पुरुषांसोबत ठेवले लैंगिक संबंध आणि… पुरुषाला एकाच वेळी झाली मंकीपॉक्स, कोविड-19 आणि एचआयव्हीची लागण
इटलीतील एका 36 वर्षीय पुरुषाला एकाच वेळी मंकीपॉक्स, कोविड-19 आणि एचआयव्हीची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. तज्ञांनी निदर्शनास आणले की हे 3 विषाणूंचे पहिले ज्ञात सह-संक्रमण प्रकरण आहे आणि हे मिश्रण रुग्णाची स्थिती बिघडवू शकते की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या व्यक्तीला स्पेनच्या सहलीवरून परतल्यानंतर काही दिवसांनी ताप, थकवा आणि घसा खवखवणे […]
दिल्लीत 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशात एकूण रुग्णांची संख्या 9
दिल्ली : दिल्लीतील एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 31 वर्षीय नायजेरियन महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासह, भारतातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत चार जणांमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे. तर केरळमध्ये पाच प्रकरणे समोर आली आहेत. देशात आतापर्यंत 9 जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
ब्रेकिंग! दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला
दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. येथे एका नायजेरियन व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नायजेरियातील ही दुसरी व्यक्ती आहे ज्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत मंकीपॉक्स पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची पुष्टी झाली आहे. केरळमध्ये UAE मधून परतलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीला आज मंकीपॉक्सची लागण […]
केरळमध्ये मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला, देशातील रुग्णसंख्या 7 वर पोहोचली
केरळ : केरळमध्ये मंगळवारी मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळून आला. हा केरळमधील पाचवा आणि भारतातील सातवा मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला रुग्ण आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 30 वर्षीय रुग्ण यूएईहून 27 जुलै रोजी कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. त्याच्यावर सध्या मलप्पुरममध्ये उपचार सुरू आहेत. दिल्लीत काल एका 35 वर्षीय नायजेरियन व्यक्तीची मंकीपॉक्सची चाचणी […]
घाबरू नका पण काळजी घ्या… मंकीपॉक्सविषयी जाणून घ्या…
पुणे : भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकीपॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी […]
महत्वाची बातमी! आरोग्य मंत्रालयाकडून मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली : भारताने मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांशी जवळचा संपर्क, मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतरांशी संपर्क टाळावा. सर्व आंतरराष्ट्रीय […]
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ, केंद्राने पाठवली उच्चस्तरीय टीम
केरळ : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले की, परदेशातून परतलेल्या 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी झाली आहे. केरळ आणि देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच घटना आहे. तत्पूर्वी, केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, […]
चिंताजनक! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळली मंकीपॉक्सची लक्षणे, रुग्णालयात दाखल
केरळ : परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांचे नमुने गोळा केले गेले आहेत आणि चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत. चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतरच या आजाराची पुष्टी करता येईल. वीणा जॉर्ज म्हणाल्या कि, “त्या […]
मंकीपॉक्स चाचणीसाठी गाझियाबादच्या 5 वर्षांच्या मुलीचे घेतले सॅम्पल, मंकीपॉक्सविषयी जाणून घ्या…
उत्तर प्रदेश : मंकीपॉक्स चाचणीसाठी 5 वर्षांच्या मुलीचे सॅम्पल गोळा करण्यात आले असल्याची माहिती गाझियाबादच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की हा एक सावधगिरीचा उपाय आहे, कारण तिने तिच्या अंगावर खाज सुटण्याची आणि पुरळ उठण्याची तक्रार केली होती. तिला इतर कोणतीही आरोग्य समस्या नाही आणि तिने किंवा तिच्या जवळच्या […]



