Enable a network of laboratories to control cybercrime - Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. डी. बी नगर पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे […]

Road works in rural areas of Palghar will be completed - Minister of State for Public Works Indranil Naik
महाराष्ट्र मुंबई

पालघर येथील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची सुधारण करण्यात येऊन रस्ते चांगल्या दर्जाची करण्यात येतील. दाभेरी ते बोपदरी या राज्य मार्गावर २.९ किलोमीटर आंतराच्या रस्ता सुधारणा कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच दाभेरी – राहूळ – सागपाणी या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुरू असून दोन्ही रस्ते मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात […]

strict MCOCA laws would be invoked against cow smugglers - Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

गायींची तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका कायद्यांतर्गत कारवाई – देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घोषणा केली की गोहत्या आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्यामध्ये वारंवार गुन्हेगार असलेल्या अतिक कुरेशीच्या प्रकरणाकडे लक्ष वेधून विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की राज्य सरकार गायी तस्करीच्या प्रकरणांवर बारकाईने […]

Nagpur violence: CM Fadnavis vows strict action
नागपूर महाराष्ट्र

नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आश्वासन, म्हणाले, ‘त्यांना’ कबरीतूनही बाहेर काढू…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि नागपूरमधील अलिकडच्या हिंसाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा सांगितले की पोलिस आयुक्तांनी (सीपी) असे म्हटले आहे की चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला […]

महाराष्ट्र मुंबई

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी भू-संपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहादा येथे औद्योगिक वसाहत स्थापन करून या भागात औद्योगिक गुंतवणूक व उद्योग सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगीकरणा बाबत […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही सहन करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना विधानसभेत व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना […]

Chief Minister Devendra Fadnavis greets at Vidhan Bhavan on the occasion of Chhatrapati Sambhaji Maharaj's martyrdom day
महाराष्ट्र मुंबई

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात अभिवादन

मुंबई : विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, इतर मागास […]

महाराष्ट्र मुंबई

‘एमपीएससी’द्वारे विविध विभागातील रिक्त पदभरतीस गती देणार – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात. ही पदभरती गतीने करण्याबाबत आणि बहुपर्यायी (मल्टीकॅडर) भरती प्रक्रियेत प्रतिक्षा यादी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती […]

Ravindra Dhangekar resigns from Congress party
पुणे महाराष्ट्र राजकारण

रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, आज घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करताना धंगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे गट) सामील होण्याचे संकेत देत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी स्पष्ट केले […]

rss leader bhayyaji joshi clarifies after political backlash over statement on mumbai language
महाराष्ट्र मुंबई

‘मुंबईची भाषा मराठी आहे की नाही हा प्रश्नच नाही’, भैय्याजी जोशींची ‘त्या’ वक्तव्याबद्दल सारवासारव

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या […]