पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]
टॅग: Maharashtra news
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
जेवणात चिकन मागितल्याने राग अनावर, आईने बेदम मारहाण केल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पालघर : पालघरमधील घोडीला कॉम्प्लेक्स परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जेवणात चिकन हवे अशी मागणी केल्यामुळे रागाच्या भरात आईने आपल्या सात वर्षांच्या मुलाला लाटण्याने बेदम मारहाण केली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आपली दोन मुले आणि दोन बहिणींसोबत घोडीला […]
पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, ८० हजाराचा मुद्देमाल जप्त
पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून […]
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगीसह हिवरे ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती […]
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन करुन अवैधपणे वाहतूक करणाऱ्या […]
राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार; प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी
मुंबई : राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. […]
काळू धबधब्याजवळ दरड कोसळली, पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट
पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार […]
नाशिकमध्ये धक्कादायक घटना! पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याचा राग, दुसऱ्या पत्नीने भावांच्या मदतीने केली पतीची हत्या
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आडगाव-सैयद पिंपरी रोड परिसरात पतीने पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने दोन भावांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नी व तिच्या भावांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव भावसार मूलचंद पवार उर्फ बाला असून तो खेळणी विक्रीचा व्यवसाय […]










