It is almost certain that there will be a lockdown in Maharashtra
महाराष्ट्र

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. […]

The state government is planning to impose strict restrictions - Rajesh Tope
महाराष्ट्र

कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे

मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय […]

Gopichand Padalkar arrested in MPSC agitation
पुणे महाराष्ट्र

MPSC आंदोलन प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक

पुणे : MPSC ची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची धरपकड केली […]

Lockdown announced in Nagpur city
कोरोना नागपूर महाराष्ट्र

नागपूर शहरात लॉकडाउनची घोषणा, पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा

कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं कि, “लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी […]

Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local
महाराष्ट्र मुंबई

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]

Pankaja Munde's Vaidyanath Sahakari Sugar Factory
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि […]

Allow meals in restaurants
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी द्या

मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे त्यामुळे लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने […]

महाराष्ट्र राजकारण

लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही- मनसे प्रमुख राज ठाकरे

२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली. सुरूवातीच्या काळात कोणाला करोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थिती समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक […]