मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी आदी उपस्थित होते.
टॅग: defense minister Rajnath Singh
पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का? – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच […]
शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले, भारतीय सैन्य एक इंच जमीनही शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही
दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजन केले. रविवारी सकाळी त्यांनी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकाला श्रद्धांजली वाहिली आणि सैनिकांना संबोधित केले. त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते. शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की यावेळी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, […]



