मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे […]
टॅग: Corona outbreak
सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
सातारा : सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. […]
कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह
पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]
मोठा निर्णय : RTPCR चाचणी निगेटिव्ह परंतु कोरोनाची लक्षणे असल्यास तो कोरोना रुग्णच…
उत्तर प्रदेश : कोरोनाचे वाढते रूग्ण आणि आरटीपीसीआर चाचणी सतत नकारात्मक येऊन देखील वाढणारा कोरोना संसर्ग या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आणि जर त्याला कोरोनाची लक्षणं जाणवत असतील तर त्याच्यावर कोरोना पेशंटप्रमाणे उपचार होतील आणि त्याला प्रिझ्मटिव्ह कोविड […]
कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत २ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणानं देशात अगदी भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. भारतात कोरोना संक्रमणाचे आकडे दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. बुधवारी २४ तासांत एकूण २ लाख ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर १०३८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील […]





