मुंबई : भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता व चांगल्या भविष्यासाठी सहकार्य मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिन आणि मुंबई-एंटेबे थेट उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. […]
टॅग: Chief Minister Eknath Shinde
नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलत आहे. शहरी नक्षलवादास प्रतिबंध करण्यासाठी सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करत, नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन येथे नक्षलवादावरील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात […]
ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा
नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्त्वाच्या बैठकांसाठी आज सकाळी नवी दिल्ली येथे आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून […]
शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर! योजना, निर्णयांची मिळणार अचूक, अधिकृत माहिती…
मुंबई : ‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’, अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉट्सॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत […]
श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
श्रीनगर : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी […]
काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, ‘सरहद’च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्रीनगर : महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब […]
आगामी काळातील सार्वजनिक सण उत्सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरा करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यातील मोठा उत्सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण, उत्सव तोलामोलात, जल्लोषात, उत्साहात, गुण्यागोविंदाने, शांततेत, भक्तिभावाने मंगलमय वातावरणात कोणताही गालबोट न लागता साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या निराला बाजार येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. […]
गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटीबध्द असून समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील एक वर्षात शासनाने सुमारे 112 कोटी रुपये गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दिले असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शहरातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय […]










