मुंबई : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी मौजा बडनेरा येथील २ हेक्टर ३८ आर जमीन ३० वर्षासाठी उपलब्ध करून देण्याचा राज्य मंत्रिमंडळ निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र पुरस्कृत पी.एम.ई. बस योजनेंतर्गत अमरावती महापालिकेने ई-बस डेपो व चार्जिंगकरिता जमीनीची मागणी केली […]
टॅग: सार्वजनिक वाहतूक
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]
मुंबईतील मेट्रो मार्ग-२ व ७ प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ
मुंबई : मुंबईतील मेट्रो मार्ग-2 अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2 ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू […]
मुंबईतील वॉटर मेट्रोचे काम जलदगतीने सुरू करा – मंत्री नितेश राणे
मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात […]
परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात परिवहन […]
एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला मिळेल पगार, प्रताप सरनाईक यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा
मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळेल, याचे स्पष्ट आणि ठोस आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आर्थिक अडचणी असूनही, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार नाही याची जबाबदारी माझी असेल.” एसटी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. […]
महाराष्ट्र बजेट २०२५ : अजित पवारांकडून अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्य विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतील अकरावा अर्थसंकल्प आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. रोजगार निर्मिती अजित पवार यांनी रोजगार निर्मितीसाठी […]






