मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोविड […]
टॅग: विजय वडेट्टीवार
राज्यात कडक लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता; दोन दिवसांत निर्णय.. ‘या’ मंत्र्याचे मोठे विधान
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री […]
विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क! महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर […]
मुंबई उपनगरीय लोकलसेवा सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती..
मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून होणाऱ्या आडकाठीवरही नाराजी व्यक्त केली. ‘सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही […]




