10 lakh insurance cover for Govindas now from the government
महाराष्ट्र मुंबई

गोविंदांना आता शासनाकडून 10 लाखाचे विमा संरक्षण

मुंबई : गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी होती, या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी […]

Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत, 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री […]

A music college should be started on Lata Didi's birth anniversary on September 28 - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

लता दीदींच्या जयंतीदिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च […]

A wave of patriotism in the country due to 'Ghroghari Triranga' campaign - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

‘घरोघरी तिरंगा’ अभियानामुळे देशात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची लाट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाले असून यामुळे राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची मोठी लाट आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या स्वागतानिमित्त हॉटेल ताज महल पॅलेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले […]

Chief Minister Eknath Shinde emphasizes on radical changes in Maharashtra's agriculture sector
देश महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत सांगितले. निती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांनुसार राज्य सरकार विविध उपयायोजनांच्या माध्यमातून देश […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र मुंबई

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार […]

The period of payment of premium will be extended – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण (फ्री होल्ड) प्रक्रियेसाठी काही वेळा विलंब होतो हे लक्षात घेता अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या (कलेक्टर लँड) हस्तांतरण (फ्री होल्ड) जमिनीचा धारणाधिकार रुपांतरणाबाबत बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार भरत […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र सातारा

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. […]

Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व प्रशासकीय बैठका रद्द

मुंबई : सततचे दौरे आणि सभा यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, बैठका, भाषणं, […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

माहिती व जनसंपर्क मधील दोन लिपिकांच्या सेवा त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सेवायोजन कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या २ लिपिकांच्या नियुक्त्या त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. लोकराज्य अंकासाठी काम करणाऱ्या श्रीमती प्रेमिला कुंढडिया आणि जावेद अब्दूल वाहीद खान यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला.