मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या ३ नियमित व १७ कंत्राटी पदांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक आणि युवतींचा विकास घडविण्यासाठी महाज्योतील संस्थेच्या धर्तीवर अमृत ही नवीन संस्था […]
टॅग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा. असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्यावतीने हांडेवाडी रोड, महम्मदवाडी येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. […]
गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणांना निर्देश
पुणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री गजाननाची आरती केली. यावेळी कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त हेमंत रासने, बाळासाहेब परांजपे, […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची केली पाहणी
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य […]
राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने बांद्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महामंडळाचे कार्य […]
केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक
मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ पुस्तिकेचे प्रकाशन
औरंगाबाद : जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘औरंगाबादची विकासाकडे घोडदौड’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (३१ जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयात झाले. या माहिती पुस्तिकेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शासनाच्या योजना आणि प्रकल्पाची फलनिष्पत्ती याविषयीच्या माहितीचा समावेश आहे. प्रकाशनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड,खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री […]
पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद : राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच शहरातील टी.व्ही. सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे कालपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिल्लोड येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्री सायंकाळी […]
पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पोलिस गृहनिर्माण संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. […]









