कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं कि, “लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी […]
टॅग: नागपूर
नागपूर हादरले, १० वर्षांच्या मुलीवर चुलत भावाने केला बलात्कार
नागपूर : १० वर्षांच्या मुलीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना ३ मार्च रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. ही घटना कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगनाबोडी गावात घडली. याप्रकरणातील आरोपी तरुण एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित मुलगी ही त्याची सख्खी चुलत बहीण असून इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी आहे. […]
भयंकर : वडिलांनी केली दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या
नागपूर : वडिलांनी दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर या व्यक्तीने स्वत:च्याही गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयाम (वय २६) असे वडिलांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी […]
ब्रेकिंग : कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण, नागपूर कारागृहात भोगतोय शिक्षा
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती […]
मोठी बातमी : कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण, नागपूर कारागृहात भोगतोय शिक्षा
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती […]
अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने दिले चुकीचे औषध…
ठाणे : अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिल्यामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. त्यानंतर बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस दिलेल्या माहिती नुसार, शुभम छोटू कटरे (वय २४, रा. मौदा) याची सतरावर्षीय मुलीशी ओळख झाली. १ जानेवारी २०२० […]
२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांची निवड
मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील […]
धक्कादायक : प्रियकराने टोकाच्या वादातून प्रेयसीला जिवंत जाळलं
नागपूर : प्रियकराने टोकाच्या वादातून विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत […]
ब्रिटनवरून नागपूरमध्ये परतलेला तरुण कोरोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच नागपूरमध्ये परतलेला एक २८ वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूरमधील नंदनवन येथील रहिवाशी असलेला हा तरुण पुण्यात एका कंपनीत कामाला आहे. महिनाभरापूर्वी […]
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]









