पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट गावांसह परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रद्धा पोतदार, पुणे महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. […]
टॅग: सिंहगड रोड
पुणे : नऱ्हे येथील पारी चौकातील वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पाठपुरावा, उपाययोजनांची अपेक्षा…
पुणे : धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले […]


