Chakanakar Appreciates More’s Efforts as Sinhgad Road Review Meeting Addresses Key Civic Problems
पुणे महाराष्ट्र

नऱ्हे परिसरातील विविध प्रश्नांवर भूपेंद्र मोरेंची ठाम भूमिका; आढावा बैठकीत चाकणकरांकडून कौतुक

पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट गावांसह परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आदी मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रद्धा पोतदार, पुणे महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक समस्या तसेच नवले पुलाजवळ सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर ठामपणे आवाज उठवला. मागील चक्काजाम आंदोलनानंतर प्रशासनाने काही कामे हाती घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, परिसरात अधिक स्ट्रीट लाईट व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणीही केली.

रूपाली चाकणकर यांनी मोरे यांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांनीही या विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे, सौरभ मते, सागर कोल्हे, विकास हगवणे, भाग्यश्री कामटे, सायली टिळेकर, विठ्ठल सूर्यवंशी, राजेभाऊ जाधव, सुरज दांगडे यांच्यासह अनेक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्तेत असूनही मोरेंचा चक्काजाम; चाकणकरांकडून कौतुक

नऱ्हे परिसरातील भूपेंद्र मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला कार्याध्यक्ष आहेत. तरीही ते सातत्याने आंदोलने करत असतात. मागील आठवड्यात चक्काजाम आंदोलनाची जोरात चर्चा झाली होती. यासंबंधी पत्रकारांनी चाकणकर यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, “मोरे हे जनतेसाठी हिरारीने धावणारे नेतृत्व आहे. जनतेच्या हिताखातर केलेले आंदोलन हे कौतुकास्पद आहे. त्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा ठाम संकल्प दिसतो.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत