मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]
टॅग: राजेश टोपे
राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा
मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]
कोरोनाचा लहान मुलांमध्ये वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं […]
महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार […]
राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]
कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे
मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय […]
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटले कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी […]
सर्वसामान्यांना कोरोना लस केव्हा मिळणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच लशीसाठी सामान्यांना फार वाट पाहावी लागणार नाही, सामान्य नागरिकांसाठी चार ते पाच महिन्यांत लस उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सामान्य नागरिकांसाठीच्या कोरोना लसीकरण मोहिमेवेळी लशीची कमतरता भासणार […]
राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण
मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी […]
कोरोना लसीविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, लस देण्याची सर्व तयारी पूर्ण
जालना : कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय, असे महत्त्वाचे विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राजेश टोपे यांनी पुढे सांगितले कि, देशातील पाच औषध कंपन्या […]










