यवतमाळ : पुसद तालुक्यातील धनसळ गावात रामपूरनगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ९.30 वाजताच्या सुमारास घडली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही एकाच गावात राहत होते. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. […]
टॅग: यवतमाळ
अंगावार वीज पडल्यामुळे 5 मुलं गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या […]
चिंता वाढली, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन स्ट्रेन यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही भागात आढळून आला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यातच आता आणखी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. डॉ. गुलेरीया यांनी म्हटलं आहे कि, या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड […]
धक्कादायक : 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणादरम्यान पाजलं सॅनिटायझर
पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहानग्यांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे घडला आहे. या 12 बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुलांना उलट्या सुरु झाल्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत. मुलांना लस […]




