मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी […]
Tag: नरेंद्र मोदी
महत्वाची बातमी : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू, या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा, प्रियजनांची माहिती मिळवा…
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. ह्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत 2 महिलांसह 12 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. Extremely saddened by the loss of lives due to a stampede at Mata Vaishno Devi Bhawan. Condolences […]
पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद आणि हुगली येथे प्रत्येकी नऊ आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज कोसळून जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. पहिली घोषणा सर्व राज्यांना आता केंद्राकडून मोफत लस दिली जाईल. आता राज्यांना यासाठी काही खर्च करावा लागणार नाही. तर दुसरी घोषणा म्हणजे, देशातील 80 कोटी गरीब लोकांना नोव्हेंबर म्हणजे दिवाळीपर्यंत मोफत रेशन दिले जाईल. पंतप्रधान मोदी […]
‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका
मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं आरोप […]
नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणणाऱ्या सोनियांकडे खरंच दुरदृष्टी.. मोदींवर घणाघाती टीका
मुंबई : देशात कोरोनामुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागत आहेत आणि केंद्र सरकार आरोग्य सुविधा पुरवण्यास अयशस्वी ठरत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत. या सगळ्या परिस्थितीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानलं आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट करत देशाच्या गंभीर […]
महाराष्ट्रात ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना केली विनंती…
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील भीषण परिस्थिती विषयी सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स […]
पंतप्रधान मोदी फार सरळमार्गी नेते, राष्ट्रीय एकात्मता फक्त काँग्रेसचा मक्ता नाही – संजय राऊत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा […]
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर गुलाम नबी आझाद यांनी दिलं ‘हे’ उत्तर
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. संसदेत त्यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु आता स्वत: गुलाम नबी […]
शेतकरी आंदोलन : पुढील बैठक 2 फेब्रुवारीला, ‘मन की बात’ वर राकेश टिकैत म्हणाले..
शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]