Dilip Walse Patil
महाराष्ट्र

‘होमगार्ड’साठी विशेष धोरण तयार करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : पोलिस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. राज्यात कार्यरत होमगार्डना नियमित स्वरूपात 180 दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य […]

Governor, Deputy Chief Minister, Home Minister greet the martyrs of 26/11 attacks
महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी […]

strict action against those who transport and sell gutka
महाराष्ट्र

महाराष्ट्रात गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी सुरु, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री […]

Newly appointed Consul of Singapore meets Home Minister Dilip Walse Patil
महाराष्ट्र मुंबई

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट

मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले. सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस […]

Dilip Walse Patil
नागपूर महाराष्ट्र

आमच्या पोलिसांचा मला अभिमान, गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश

मुंबई : विविध संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्रधान्याचा विषय असून गृह विभागाने सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठित समितीने […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व व्यापारक्षम करण्यात यावा तसेच ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र मुंबई

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र मुंबई

भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली. दरम्यान, विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई राजकारण

देवेंद्र फडणवीसांना भोवणार ‘ते’ प्रकरण? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत…

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणी पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्री दिलीप […]