बीजिंग : चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार २०१५ मध्येच केला होता. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच त्यांनी याबाबत चर्चा केली होती. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल, असे भाकित देखील त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. […]
टॅग: कोरोना विषाणू
ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये आढळला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन
ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांपैंकी अनेक जण बेपत्ता असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. आत्तापर्यंत ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. मंगळवारी ही संख्या ६ वर होती. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात ब्रिटनहून जवळपास ३३ हजार प्रवाशी भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबादच्या लॅबमध्ये […]
कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो, संशोधनात समोर आली माहिती
कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरु आहे. त्यातच आता नवीन संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. ‘नेचर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात कोरोनाचा विषाणू शरीराच्या विविध अवयवांपर्यंत कसा जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. वास न येणे, चव नसणे, डोकेदुखी, […]



