नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]
टॅग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार
मुंबई : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या […]
नागालँड गोळीबार प्रकरणाचे संसदेत पडसाद, अमित शहा देणार स्पष्टीकरण
नवी दिल्ली : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी एका माहितीच्या आधारे दहशतवादी समजून एका वाहनावर गोळीबार केला. पण या वाहनात दहशतवादी नव्हते, तर कोळसा खाणीत काम करणारे मजूर असल्याचं गोळीबारानंतर लक्षात आलं. या गोळीबारात १३ मजूर ठार झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलांची वाहनं पेटवून दिली. या घटनेत १ जवान ठार झाला. […]
गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल, NSUI ने केली तक्रार
नवी दिल्ली : ‘नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणं आणि सेवा करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. गृहमंत्री शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल […]
ब्रेकिंग : मोटेरा स्टेडियमचे नाव झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’, जाणून घ्या या स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज अहमदाबादच्या या स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. उयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]
TMC च्या हिंसा, भ्रष्टाचार आणि खंडणी यातून लोकांना मुक्त व्हायचे आहे – अमित शाह
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आज (११ फेब्रुवारी) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिवर्तन सभा घेतली. यावेळी त्यांनी टीएमसीवर गंभीर आरोप केला आहे. शाह सभेत बोलताना म्हणाले कि, ”बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही […]
मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. काय म्हणाले अमित शाह? “सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. […]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज महाराष्ट्र दौरा
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत. अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड […]
पोलीस स्मृती दिन : करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहिद
गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती यावेळी अमित शहा यांनी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक […]