विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आज (११ फेब्रुवारी) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिवर्तन सभा घेतली. यावेळी त्यांनी टीएमसीवर गंभीर आरोप केला आहे. शाह सभेत बोलताना म्हणाले कि, ”बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.”
अमित शाह पुढे बोलताना म्हणाले कि, ”जर बंगालमध्ये जय श्रीराम म्हणणार नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणतील. केवळ एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी असं करत आहेत.”
तसेच त्यानंतर त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. त्यांनी सभेचे काही फोटो शेयर केले आणि म्हटलं आहे कि, अराजकवादी आणि अक्षम टीएमसी सरकारमुळे पश्चिम बंगालने खूप सहन केलं आहे. ममता दीदी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. बंगालमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. लोकांना टीएमसीची हिंसा, भ्रष्टाचार आणि खंडणी या सर्व गोष्टींतून मुक्त व्हायचे आहे.
West Bengal has suffered a lot because of the anarchist and incompetent TMC government. Mamata didi led TMC govt has no moral right to remain in power. #PoribortonInBengal pic.twitter.com/b8VAf6ZPWl
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2021
Winds of change blowing in Bengal. People want to get rid of TMC’s violence, corruption and extortion.
Here are some pictures from Cooch Behar’s Poribortan Yatra. #PoribortonInBengal pic.twitter.com/8qpBFKt9hl
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2021




