सांगली : पर्यावरणातील बदलामुळे व मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी एकावेळी झाल्यामुळे 2019, 2021 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागले. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) प्रकल्प राबवित आहोत. जागतिक बँकेच्या माध्यमातून लवकरच 500 कोटीच्या कामाचे टेंडर काढू. पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 3200 कोटीचा प्रकल्प राबवत असून दुसऱ्या […]
टॅग: आपत्कालीन प्रतिसाद
मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद […]
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]
चीनच्या लिओयांग शहरातील रेस्टॉरंटला भीषण आग, २२ जणांचा मृत्यू
चीन : मंगळवारी चीनच्या लिओनिंग प्रांतातील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. दुपारी १२:२५ वाजता ही आग लागली, आणि या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू […]
पूजा करताना पेटलेली वात अंगावर पडली, गंभीर भाजल्याने महिलेचा मृत्यू
ठाणे : देवपूजा करताना दिव्याची पेटती वात अंगावर पडल्याने एक ४८ वर्षीय महिला गंभीररित्या भाजली. तत्काळ रुग्णालयात दाखल करूनही उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्चना धर्मेंद्र कुमार (वय ४८) असे या मयत महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. शनिवारी सकाळी अर्चना कुमार या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे देवपूजा करत […]
हृदयद्रावक! जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आईचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
पुणे : आईच्या घरी आलेल्या एका विवाहित महिलेने तिच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून नंतर स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी साडेसहाच्या सुमारास हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (३५) असे या […]
पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील माळवाडी, गोकुळ नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्फोटात लागलेली आग विझवण्याचे […]
संतापजनक! मद्यधुंद कार चालकाची समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक, अनेकांना चिरडले, तिघांचा मृत्यू
राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप […]
बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज (दि. २ एप्रिल) पहाटे तिहेरी अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे स्थानिक आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सकाळी पाच वाजेच्या सुमारास खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाट्याजवळ हा भीषण […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन जण गंभीरपणे जखमी
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ मंगळवारी एक मोठा अपघात घडला, ज्यात अनेक वाहनांची विचित्र टक्कर झाली. यात दोन जण जखमी झाले. हा अपघात खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कंटेनर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्यावर उभा होता. ट्रकचे इंजिन बंद पडल्यामुळे, दोन मेकॅनिक त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्या ट्रकच्या जवळ उभे […]