ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी […]
टॅग: आग
पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटला आग; चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मिळालेल्या माहिती नुसार, […]
मक्याचे कणीस भाजताना लागली आग, एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू
बिहार : अररिया जिल्ह्यातील पलासीच्या कबाया गावात एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू झाला. ही सर्व मुलं अडीच ते 5 वर्षांची होती. ते सर्वजण एका खोलीत मक्याचे कणीस भाजत होते. मात्र, तिथे जवळच गुरांसाठी सुका चारा ठेवलेला होता. त्यात ठिणगी पडून अचानक आग लागल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागल्यानंतर […]
अग्निशमन दलाच्या अधीक्षकांचा अपघाती मृत्यू, फॅशन स्ट्रीट येथील आग विझल्यानंतर निघाले होते घरी
पुणे : पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा मृत्यू झाला आहे. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट येथील बाजारपेठेला लागलेली आग नियंत्रणात आल्यानंतर ते घरी निघाले असताना हा अपघात झाला. फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागल्यानंतर प्रकाश हसबे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. […]
साताऱ्यात बस डेपोमध्ये सहा शिवशाही बसला भीषण आग
सातारा : साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसने देखील पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु […]
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मांजरी येथील याच ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात होतं. आग लागलेल्या इमारतीपासून जवळच प्रोडक्शन प्लांट असल्याची माहिती मिळत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून […]
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आग लावली कि लागली? जाणून घ्या…
पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. […]
थर्माकोल कंपनीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही
मुंबई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे कंपनी असलेल्या संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोळ पहायला मिळत आहे. या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबात राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा फाट्याजवळ ही […]
मुंबईत सिटी मॉलमध्ये आग, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी मॉलला आग लागल्याची माहिती मिळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मॉलमधील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यासोबतच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सिटी सेंट्रल मॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग […]