Veteran tennis player and former Davis Cup coach Akhtar Ali dies
क्रीडा

दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे निधन

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे आज (७ फेब्रुवारी) कोलकाता येथे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारताचे सध्याचे डेव्हिस चषक प्रशिक्षक झीशान अली यांचे वडील अख्तर यांनी रमेश कृष्णन, विजय अमृतराज, आनंद अमृतराज आणि लिअँडर पेस या खेळाडूंना प्रशिक्षण दिले. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने अखिल अख्तर अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अख्तर यांनी 1958 ते १964 दरम्यान डेव्हिस चषकात आठ सामने खेळले. तसेच ते भारतीय संघाचे नेतृत्व करत होते आणि प्रशिक्षकही होते.

ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत अख्तर अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “टेनिसचे दिग्गज अख्तर अली याच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. ‘अख्तर सर’ यांनी भारतातील अनेक टेनिस चॅम्पियनला प्रशिक्षण दिले. 2015 मध्ये आम्ही त्यांना बंगालचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान केला. नेहमी त्यांचे प्रेम मिळाले.” ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत