नवी दिल्ली : सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे सचिव जय शाह यांनी ANI ला सांगितले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी सांगितले की, ‘काहीतरी नवीन’ सुरू करण्याची त्यांची योजना आहे ज्यामुळे ‘बर्याच लोकांना मदत होईल.’ “आज मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे मला वाटते की कदाचित लोकांना मदत होईल,” असं त्याने त्याच्या चाहत्यांकडून पाठिंबा मागताना ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्याच्या क्रिकेट प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल गांगुलीने त्याच्या चाहत्यांचे आणि समर्थकांचे आभार मानले. तो म्हणाला, “१९९२ मध्ये क्रिकेटसह माझा प्रवास सुरू झाल्यापासून २०२२ हे ३० वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे.” त्याच्या ट्विटनंतर लगेचच गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
अलीकडेच गांगुली राजकारणात येण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरु आहे, विशेषत: गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर या चर्चेत भर पडली होती. मात्र आता जय शाह यांनी गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
— ANI (@ANI) June 1, 2022




