भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या डावात 244 धावा केल्या असून या कसोटी सामन्यात भारतानेही चांगली सुरुवात करुन ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मात्र, जेव्हा मोहम्मद शमी सामन्यात गोलंदाजी करायला आला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
या सामन्यात शमीने फाटलेला शू घातला आहे. सामन्यादरम्यान जेव्हा शमीच्या डाव्या पायाच्या शूवर कॅमेरा फोकस होता तेव्हा त्याचा शू समोरच्या बाजूने फाटलेला होता. अॅडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ आणि शेन वॉर्न हे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू कॉमेंट्री करताना याबद्दल बोलत होते.
शेन वॉर्न म्हणाले की, मोहम्मद शमीचा हाई आर्म अॅक्शन (high arm action) आहे. त्यामुळे जेव्हा तो बॉल टाकतो तेव्हा त्याच्या डाव्या पायाचे बोट शूजच्या आतील बाजूस जाते आणि यामुळे गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात. हे टाळण्यासाठी, शमीच्या एका शूजमध्ये छिद्र दिसत आहे. त्यानंतर त्यांनी विनोद केला की, आशा आहे की शमी फलंदाजी दरम्यान फाटलेला शूज घालणार नाही, कारण ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यॉर्कर बॉल्सने त्याला अवघड परिस्थितीत टाकू शकतात.