IPL 2020 : कोलकाताने चेन्नईविरुद्ध सामन्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार झालेली असताना चौथ्या स्थानावर आपला हक्का कायम ठेवण्यासाठी कोलकात्याला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चेन्नई सुपरकिंग्जचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यामुळे इतरांचं गणित बिघडवण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. नितीश राणाने ८७ धावांची आक्रमक खेळी केली.
नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या फलंदाजांनी चेन्नईविरुद्ध सामन्यात चांगली सुरुवात केली. शुबमन गिल आणि नितीश राणा या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत पहिल्या षटकांमध्ये सामन्यावर कोलकाताचं वर्चस्व राहील याची काळजी घेतली. दोन्ही फलंदाजांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाल्यानंतर कर्ण शर्माने गिलला माघारी धाडत कोलकाताची जोडी फोडली. यानंतर कोलकाताच्या डावाला लागलेली गळती लागली लागली.
Innings Break!#KKR post a total of 172/5 on the board. Will #CSK chase this down?
Scorecard – https://t.co/pxx3yYaVsq #Dream11IPL pic.twitter.com/QXMxtQUY6b
— IndianPremierLeague (@IPL) October 29, 2020
नितीश राणाने एक बाजू सांभाळून घेत कर्णधार मॉर्गनसोबत भागीदारी करत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत नितीश राणाने ८७ धावा केल्या. कर्णधार मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून एन्गिडीने २ तर सँटनर, जाडेजा, शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.




