Ravi Mhatre
महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहाय्यक बदलला? रवी म्हात्रे यांना संधी तर मिलिंद नार्वेकर आऊट?

मुंबई: आगामी काळात मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे हेच उद्धव ठाकरे यांचा ‘राईट हँड’ असतील, अशी चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात आहे. रवी म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय असल्याने शिवसैनिकांशी त्यांचा चांगल्याप्रकारे संपर्क आहे. रवी म्हात्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. त्या काळात बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेब ठाकरे यांना फोन केला तर तो आधी रवी म्हात्रे घेत असत. आमदार, खासदार, शाखाप्रमुख आपल्या समस्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. याशिवाय, रवी म्हात्रे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठीही काम करत होते. मात्र, शिंदे गटाच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून म्हात्रे प्रामुख्याने दिसत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती रवी म्हात्रे यांचा वावर होता. रवी म्हात्रे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतील व्यक्तींपैकी म्हणून एक ओळखले जातात. मध्यंतरीच्या काळापासून रवी म्हात्रे हे संघटनेत फारसे सक्रिय नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रवी म्हात्रे यांचा शिवसेना भवनातील वावर लक्षणीयरित्या वाढला होता. शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना चौकडीचा उल्लेख केला होता. मिलिंद नार्वेकर या चौकडीतील प्रमुख सदस्य होते. मिलिंद नार्वेकर आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, असे आरोप आजपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्यामुळेच की काय शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असणारे मिलिंद नार्वेकर यांची जागा आता रवी म्हात्रे यांनी घेतली आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

गोरेगाव येथे झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांच्याभोवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे दिसून आले. त्यांचा शिवसेना भवनातील वावर अगोदरच वाढलेला आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता रवी म्हात्रे हे महत्त्वाचा दुवा ठरत आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत