BJP
राजकारण

बिहार विधानसभा निवडणूक: नऊ भाजपा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

बिहार विधानसभा निवडणूकीचा ऑनलाईन प्रचार सुरू झाला असून, जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपानंही उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्यानं भाजपातील इच्छुक नेते नाराज झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाराज झालेल्या नेत्यांनी एनडीए उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपानं नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप या बंडखोर नेत्यांचा समावेश आहे. एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवू नये, अन्यथा त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल,” असा इशारा मोदी यांनी अगोदरच दिला होता.

“आपण एनडीए उमेदवारांच्याविरोधात निवडणूक लढवत असून, यामुळे एनडीएसोबतच पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे पक्षाच्या शिस्तीविरूद्ध आहे. या कामामुळे तुम्हाला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे,” असं भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत