अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान सध्या डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत क्वारंटाइन झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला फटका बसण्याची शक्यता आहे.
Hope Hicks, who has been working so hard without even taking a small break, has just tested positive for Covid 19. Terrible! The First Lady and I are waiting for our test results. In the meantime, we will begin our quarantine process!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 2, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे”. होप हिक्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम करतात. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या चर्चेसाठी त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होत्या. व्हाइट हाऊसमध्ये करोनाची लागण झालेल्या त्या आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.




