नवी दिल्ली : शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशातील कोरोना लसीकरणाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.
Congratulations india!
PM @NarendraModi जी के जन्मदिवस पर भारत ने आज इतिहास रच दिया है।
2.50 करोड़ से अधिक टीके लगा कर देश और विश्व के इतिहास में स्वर्णिम अध्याय लिखा है।
आज का दिन हेल्थकर्मियों के नाम रहा। #HealthArmyZindabad pic.twitter.com/F2EC5byMdt
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 17, 2021




