राजस्थान : राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सरावादरम्यान मोठी दुर्घटना घडली. सराव सुरु असताना बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमधील चार्ली सेंटरमध्ये घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाला सुरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण प्रवक्त्याने (defence spokesperson) याबाबत माहिती देताना सांगितले कि, बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये प्रशिक्षणादरम्यान टँकमध्ये दारूगोळा भरत असताना दोन जवान शहीद झाले.