चंदीगढ : भारतीय वायुसेनेचं MIG -२१ लढाऊ विमान गुरुवारी रात्री उशिरा दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना पंजाबमधील मोगाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त केलं आहे.
वेस्टर्न सेक्टरमध्ये काल रात्री बायसन एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा यामध्ये मृत्यू झाला असून हे दुःखद आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत, अशी माहिती वायुसेनेकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं वायुदलानं स्पष्ट केलं आहे.
A Court of Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.
— Indian Air Force (@IAF_MCC) May 21, 2021




