क्राईम देश

भयंकर! तरुणाने दोन प्रेयसींसाठी केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात…

आग्रा : एका तरुणाने दोन प्रेयसींच्या प्रेमातून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तरुणाने गरोदर पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तो सकाळपर्यंत पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्याबरोबर त्याच्या दोन प्रेयसीची होत्या. सकाळी कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर आरोपीला पकण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी हत्येनंतर आपल्या मुलासोबत दोन मुलींना पाहिले होते. त्या दोघींनाही पोलिसांनी पकडले आहे. आग्रा येथील न्यू आग्रा पोलीस स्टेशन अंतर्गत नागला हवेली येथे सेवानिवृत्त शिक्षक आपल्या मुलांसह राहतात. त्यांचा मुलगा उपेंद्र उर्फ ​​उमंग चौधरी याचे 11 डिसेंबर रोजी प्रीतीशी लग्न झाले होते. उमंग हा दयालबाग येथील कार वॉश सेंटरचा संचालक आहे. मात्र, काल रात्री उमंग दारूच्या नशेत घरी गेला आणि त्यानंतर त्याने मैत्रिणीशी बोलणे सुरू केले. पत्नीने याला विरोध केल्याने उमंगने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. त्यानंतर तो मृतदेहाशेजारी बसून राहिला. प्रीती अडीच महिन्यांची गरोदर होती. तिचे उमंगबरोबर अनेक दिवसांपासून भांडण होत होते.

पोलिसांनी सांगितले, “महिलेच्या हत्येची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. ही हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली होती. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आरोपीचे वडिल साहिब सिंग चौधरी यांनी सांगितले की, “सकाळी वरच्या खोलीतून खाली आलो तेव्हा त्यांच्या मुलाच्या कपड्यांवर रक्त होते. त्यासोबत सुनेचा मृतदेह होता. तेव्हा मुलाबरोबर खोलीत दोन मुली देखील होत्या.”

पोलिसांनी या दोन मुलींनाही अटक केली असली, तरी या हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला उपेंद्र उर्फ ​​उमंग याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कडक शब्दांत विचारले असता त्याने सांगितले की त्याचे त्याच्या दोन मैत्रिणींशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे पत्नीशी या दोघींचे नेहमी भांडण होत असायचे. शेवटी यातूनच प्रेयसींच्या हव्यासापोटी त्याने दारूच्या नशेत पत्नीची निर्घृण हत्या केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत