The rule of sleeping in the train has changed, check the new guidelines
देश

ट्रेनने प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाताय? भरावा लागेल दंड, जाणून घ्या नवीन नियम…

IRCTC Luggage New Rules : भारतीय रेल्वे आता मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास प्रवाशांना मोठा दंड आकारणार आहे. तसेच बुकिंग न करता अतिरिक्त सामान घेऊन जाताना पकडले गेल्यास, तुम्हाला आता सामान्य दराच्या सहा पट पैसे द्यावे लागतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नियमांनुसार, प्रवासी ज्या श्रेणीत प्रवास करत आहेत, त्यानुसार रेल्वेच्या डब्यात 40 किलो ते 70 किलोपर्यंतचे वजनदार सामान प्रवासी ठेवू शकतात. अतिरिक्त सामान असल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते.

तुम्ही ज्या डब्यातून प्रवास करत आहात त्यानुसार भारतीय रेल्वेने सामानाचे दर निश्चित केले आहेत.

  • तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल, तर तुम्ही 70 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकता
  • एसी 2-टियरसाठी 50 किलोची मर्यादा आहे.
  • एसी थ्री टियरसाठी 40 किलोची मर्यादा आहे.
  • स्लीपर क्लाससाठी 40 किलोची मर्यादा आहे.
  • द्वितीय श्रेणीसाठी 35 किलोची मर्यादा आहे.

तुमचे सामान बुक करा
प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी बुकिंग स्टेशनच्या लगेज ऑफिसमध्ये सामान सादर केले पाहिजे. तुम्ही तिकीट बुक करतानाच अगोदरच सामानही बुक करू शकता. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना किमान जीवनावश्यक वस्तूंसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मंत्रालयाने ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. – “जास्त सामान असेल तर प्रवासाचा आनंद कमी होईल! ट्रेनमध्ये प्रवास करताना जास्त सामान घेऊन जाऊ नका. जास्त सामान असल्यास, पार्सल ऑफिसच्या मदतीने सामान बुक करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत