महाराष्ट्र

व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत नको- उद्धव ठाकरे

२९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आहेत. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी व्हायला लागली होती. मात्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या दिवशी राज्यातील जनतेला व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचं निसर्गचक्र हे उत्तम मानलं जातं. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं ही काळाची गरज आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत