We don't accept this position that those with records have Kunbi certificates and others don't - Manoj Jarange
महाराष्ट्र

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही – मनोज जरांगे

जालना : आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. समितीच्या अहवालानुसार नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतरांना नाही, ही भूमिका आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनाेज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, “विखे पाटील यांनी माझ्याशी संवाद साधला आहे. समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला आहे. मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यावर आपण त्यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. एका भावाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही असू नये. अन्यथा मी आंदोलन थांबविणार नाही. समितीच्या अहवालाला राज्य मागास वर्ग आयोगाचा दर्जा देवून तो अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय उद्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करावा.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत