Tourism development work in Nandurbar district should be accelerated
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, पर्यटन विकासाची प्रलंबित असणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे.

पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रकाशा (ता. शहादा) येथील केदारेश्वर मंदिर येथे घाट बांधणे व सुशोभीकरण, तोरणमाळ येथील विकास कामे, अस्तंबा येथील विकास कामे, लघु तलाव चोपाळे येथील कृष्णा पार्क येथील कामांचा सविस्तर आढावा मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय कलपे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत