Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई

श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

मुंबई : श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हरेगाव मळ्यातील शेतकरी यांनी केलेला दीर्घ कालावधीचा संघर्ष आणि व्यापक जनहित लक्षात घेता, ज्याप्रमाणे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या, त्याप्रमाणे या शेतकऱ्यांना देखील सिलींगच्या मर्यादेपर्यंत जमिनी परत करणे आवश्यक होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. तशी सुधारणा महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियमात करण्यात येईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत