Bird flu victims in the state will be compensated
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात बर्ड फ्लूने 100 कोंबड्यांचा मृत्यू, 25000 कोंबड्या नष्ट करण्यात येणार

ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 100 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे डीएम आणि जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर यांनी सांगितले की बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या संसर्गाने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास २५ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत