Four people, including two women, sentenced to 10 years in prison for inducing a minor girl into prostitution
पुणे महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना सक्तमजुरी, शिक्षणाचे आमिष दाखवले आणि…

पुणे : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच, आरोपी महिलांना शिक्षेसह प्रत्येकी २९ हजार ५०० रुपये, तसेच साथीदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ही शिक्षा ठोठावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी महिला आणि साथीदारांनी एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यात चांगले शिक्षण देण्याचे आमिष दाखवून गावाहून आणले होते. मात्र, मुलीला शाळेत पाठविण्याऐवजी आरोपींनी तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली होती. काेमल सुनील मोरे उर्फ कोरे (वय २६, रा. कोथरूड), रेश्मा महेश गायकवाड उर्फ रेश्मा सुरोसे (वय २९, रा. उत्तमनगर), सुनील ब्रिजलाल कोरे (वय २९, रा. येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. उत्तर प्रदेश), जसाराम भयाराम सुतार (वय ५७, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील नितीन कोंधे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून नऊ साथीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. मुलीचा जन्मदाखला नव्हता. त्यामुळे सरकार पक्षाने शाळेतील कागदपत्रे, तसेच शिक्षिकेची साक्ष नोंदविली. गुन्हा घडला त्यावेळी मुलगी १५ वर्षांची म्हणजेच अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले. आरोपी कोमल मोरेने मुलीला आमिष दाखवून पळवून आणल्याचे सिद्ध झाले. मुलीला वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये पाठविण्यात आले. तसेच आरोपी पुरुषांनी देखील वेळोवेळी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्यात आले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी महिलांसह चौघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत