Nashik Families Donate Over ₹1 Lakh to CM Relief Fund for Flood-Affected Farmers
नाशिक महाराष्ट्र

गिरासे आणि अलई कुटुंबियांची ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत

नाशिक : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉ. दिग्‍पाल गिरासे, आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या मदतनिधीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. गिरासे यांच्या पत्नी शुभांगी गिरासे, मुले अद्वैका आणि कियांश, मयूर अलई यांच्या पत्नी प्रियांका अलई, मुले आरोही आणि आरव उपस्थित होते. डॉ. गिरासे आणि अलई कुटुंबाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली मदत बहुमोल असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डॉ. गिरासे यांनी सांगितले की, मुलांनी दिवाळीत खर्च करण्याऐवजी हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार मदतीचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे प्रदान करण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत