नांदेड महाराष्ट्र

मुख्याध्यापकाने व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा विद्यार्थीनीचा आरोप, मुख्याध्यापकाची विष पिऊन आत्महत्या

नांदेड : एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या मुख्याध्यापकाने विष प्राशन केले. शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील कारामुंगे (वय ५५) असे आत्महत्या या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पासदगाव येथे पुष्पाजंली माध्यमिक शाळा आहे. या शाळेवर सुनील कारामुंगे हे मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत. कारामुंगे यांनी शहरातील दत्तनगर परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थीनीला २६ मार्च २०२५ रोजी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे केले. या संभाषणाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पीडित मुलीने याबाबत तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर गुरुवारी रात्री तिच्या कुटुंबियांनी सुनील कारामुंगे यांना मारहाण केली. दरम्यान पीडित मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कारामुंगे यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, जिवे मारण्याची धमकी, बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला.

मारहाण तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीने मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्यायले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ नांदेडच्या ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, १२ तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी कारामुंगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक कारामुंगे यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी माझा मानसिक छळ केला, त्यामूळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याबद्दलची पडताळणी सूरू असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करीत आहेत. व्हिडिओ कॉल मध्ये झालेले संभाषण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्यांनी मारहाण केली त्याचीही चौकशी होईल. चौकशी दरम्यान जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत