नांदेड : एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या मुख्याध्यापकाने विष प्राशन केले. शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील कारामुंगे (वय ५५) असे आत्महत्या या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पासदगाव येथे पुष्पाजंली माध्यमिक शाळा […]

