uddhav thakrey jitendra awhad

आरे जंगलासंदर्भात उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई

आरेची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय काल (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेतील वृक्षतोडीवरून प्रचंड मोठं आंदोलन उफाळून आलं होतं. रात्रीच्या वेळी झालेल्या वृक्षतोडीवरून तत्कालीन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आरे जंगलासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत