मुंबई : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ठेवली आहे. उद्या दुपारी अडीचनंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती सांबरे यांनी सांगितले. एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवरून अटक केलेल्या आठ जणांमध्ये तिघांचा समावेश आहे.
NCB तर्फे हजर असलेले ASG अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, ते मुकुल रोहतगी, अमित देसाई आणि अली काशिफ खान देशमुख यांनी केलेल्या युक्तिवादांना गुरुवारी उत्तर देतील. तसेच “मी एका तासात माझा युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” असे देखील एएसजी सिंग म्हणाले.




