Amazon founder Jeff Bezos takes note of MNS
महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’ च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.

अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर करत मनसेने केलेल्या मागणीची खुद्द बेजॉस यांनी दखल घेतली आहे, अॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत येत असल्याचंही म्हटलं आहे. ‘राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं.’ असंही चित्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत